सन १९९५-१९९६ मध्ये नागपुर शहरातील जवाहर नगर परीसरात चोरी, दरोडा व घरफोड़ी यामुळे जनता त्रस्त झाली होती. व त्यावर उपाय शोधण्याकरिता जवाहर नगरातील त्रस्त नागरिकांनी सक्करदरा पोलीस स्टेशन गाठले. तेथे पोलीस निरीक्षक श्री. जीवराज दाभाडे साहेब यांच्याशी चर्चा करत असतांना मोहोल्ला समिती स्थापन करण्याचे ठरले. ती संपूर्ण नागपूर शहरात पोली्सांना मदत करणारी एकमेव संस्था हो्ती. ही संस्था पोलीस विभागातर्फ़े स्थापन करण्यात आली होती. व त्याचे अध्यक्ष त्यावेळचे सक्करदरा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मा. श्री. सुरेश सपकाळे साहेब हे होते. पोलीसांच्या मदतीने रात्री गस्त घालने, गुन्हेगारांना पकडून देणे, सामान्य जनता व पोलीस यांचे विश्वासाचे नाते जोडणे असे विविध उपक्रम या समितीने राबविले. दिवसेंदिवस लोकांचा प्रतिसाद वाढतच गेला. व बरोबरच चोरी, दरोडा व घरफोड़ी यांचे प्रमाण अतिशय कमी झाले. सह्भागी होणार्य़ा नागरीकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच गेल्याने सभासदांना ओळखपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला.
HISTORY
Subscribe to:
Comments (Atom)